साहित्य – १½ किलो दूधी, २ कप साखर, १½ काप दूध, २ tblsp काप केलेले काजू, २ tblsp …


साहित्य – १½ किलो दूधी, २ कप साखर, १½ काप दूध, २ tblsp काप केलेले काजू, २ tblsp काप केलेले बादाम, १ tblsp काप केलेले पिस्ता, १ tblsp चारोळी, १०० ग्रॅम मावा, ५ tblsp साजूक तूप आणि १ tsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर.

कृती – प्रथम दुधीची साले काढून त्यांना धुवून आणि नंतर खिसून घ्या. एका कढईत २ tblsp साजूक तूप घालून गरम करा आणि त्यात खिसलेला दुधी घाला. २ मिनिटे परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात दूध घाला आणि एकजीव करून घ्या. आता गॅस मंद आचेवर ठेवून ( सुरुवातीस मध्यम आचेवर गॅस ठेवावा. ) २० मिनिटे शिजवून घ्या. दुधीमधून सुटलेले पाणी आणि दूध ७०% आटून गेल्यावर त्यात साखर घाला आणि एकजीव करून घ्या. आता पुन्हा १० मिनिटे मंद आचेवर साखरेतले पाणी थोडे आटेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर यात मावा घालावा आणि चांगला एकजीव करून घ्यावा. नंतर काजू, बादाम, पिस्ता, चारोळी, हिरवी वेलची आणि जायफळ पावडर घालून एकजीव करून २ मिनिटे छान परतून घ्यावे. आता गॅस बंद करून गरमागरम किंवा थंडगार दुधी हलव्याचा आस्वाद घ्यावा. Dudhi Ka Halwa | Dudhi Halwa Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad

#methiladdu #methicheladu #winterspecial #healthyrecipe #maharashtrianrecipe #ladoo #gharchaswaad #tatasampanna #instafood #instagram #recipe #recipes #food #foodie #yummy #indianrecipe #homemadefood #cook #cooking #homemadecooking #instapost #hungry #foods #tasty #tastyfood #chef #cheflife #foodphotography #youtuber #spicymemes

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *